About Us
भ्रातृमंडळ पुणे ही सामाजिक संस्था १९८७ साली सहकार संस्था नोंदणी कायदे नुसार नोंदविलेली संस्था असून, खालील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रतीवर्षी त्यामार्फत अनेकविध स्वरूपाचे विचारप्रवर्तक आणि समाजप्रबोधनात्मक असे बहूउद्देशीय सामाजिक कार्यक्रम अविरतपणे चालविले जात आहेत.
- सुशिक्षित स्वाभिमानी आणि सुसंघटीत अशा समाज बांधणीसाठी विविध स्वरूपाचे सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रकल्प राबविणे.
- युवापिढीच्या मनात सोनेरी स्वप्न पेरून त्यांना भविष्यामधील सुजाण आणि जागरूक नागरीक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणे.
- शिक्षणासाठी खेडेगावातून येणाऱ्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये अद्ययावत वसतीगृह उपलब्ध करून देणे.
- समस्त समाजबांधवांच्या शारीरिक स्वास्थ आणि निरोगी प्रकृतीसाठी योगाभ्यास शिबिर, वैद्यकीय तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, इत्यादींचे आयोजन करणे.
- बदलत्या काळातील सामाजिक गरज म्हणून विवाहेच्छू वधू वर परिचय मेळावा, घटस्पोटीत-विधवा-विधुर पुनर्विवाहेच्छू वधू-वर परिचय मेळावा आणि विवाहेच्छू वधू-वर व पालक समुपदेशन शिबिर यांचे आयोजन करणे.
- व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडीअडचणींचे निराकरण करून त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यावसायिक-उद्योजक मेळाव्यांचे आयोजन करणे.
- निरनिराळ्या परीक्षांमध्ये विहीत गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा याथोचित गौरव करून उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रेरणा देणे.
- IT मेळाव्याचे आयोजन करणे.
- रक्तदान एक सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.
- विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन करणे.
- गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अर्थसहाय्य योजना राबविणे.
- खान्देश, व-हाड या भागातील स्वादिष्ट आणि चविष्ट अशा खाद्य पाधार्थांची ओळख इतरांना करून देणाऱ्या खाद्य महोत्सवाचे आयोजन करणे.
- समाजातील यशस्वी उद्योजक, उच्चशिक्षित, वयोवृद्ध, सेवानिवृत्त, देणगीदार, हुंडा न घेणाऱ्या समाजभूषीतांचा यथोचित गौरव करणे.